सचिन पिळगावकर यांची सन्मानचिन्ह चोरीला, नोकराला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या कार्यालयात ठेवलेल्या ट्रॉफी चोरून विकणाऱ्या नोकराला सांताक्रुज पोलिसांनी अटक केली. अमृत भीमा सोलंकी असे त्याचे नाव आहे. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सचिन यांचे जुहू अपार्टमेंट येथे कार्यालय आहे. तेथे सचिन यांच्या वडिलांना मिळालेल्या आणि 1963 पासून त्यांना मिळालेल्या सरकारी आणि इतर कार्यक्रमातल्या ट्रॉफी ठेवल्या आहेत. कार्यालयात ट्रॉफी कमी होत असल्याचे सचिन यांच्या मॅनेजरच्या निदर्शनास आले. बुधवारी सचिन आणि त्याचे मॅनेजर यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक श्रीराम कोरेगावकर यांच्या पथकातील उपनिरीक्षक चौधरी आणि शिंदे यांनी तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांनी अमृतला चौकशीकरता ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ट्रॉफी भंगारवाल्याला विकल्याची पोलिसांना कबुली दिली. अमृत हा सचिन यांच्या कार्यालयात गेल्यात दहा वर्षांपासून काम करत होता.