राज्यपालांनी कंगनाचे कान टोचले असते तर आनंद झाला असता – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस

मुंबई पोलिसांना बदनाम करणाऱ्या आणि मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगना राणावतला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तातडीने भेटीची वेळ दिली, पण या भेटीत राज्यपालांनी कंगनाची कानउघाडणी केली असती तर महाराष्ट्राच्या जनतेला आनंद झाला अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यपाल कोश्यारी हे उत्तराखंडचे असले तरी आता ते सर्वस्वी महाराष्ट्राचे आहेत तसेच ते संविधानाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहेत. सर्वांनाच त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. मुंबई, महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान करणाNया कंगनाला त्यांनी चार शब्द सुनवायला हवे होते, अशी अपेक्षा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली.

राज्यपालांचा अवमान
भाजपाच्या इशाऱ्यावर बोलणाऱ्या कंगगाने राज्यपालांचाही अवमान केला आहे. राज्यपालांच्या भेटीत राज्यपाल आसनस्थ होण्याआधीच स्वतः कंगनाने खुर्चीवर बसून आमच्या राज्यपालांचाही सन्मान राखला नाही याची खदखद आमच्या मनात व जनमानसात आहे, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या