महायुतीच्या सदानंद चव्हाण व राजन साळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार सदानंद चव्हाण व राजापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार राजन साळवी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.

महायुतीचे उमेदवार आमदार सदानंद चव्हाण हे तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढवत आहेत. 2009 आणि 2014 साली त्यांनी विधानसभा निवडणूक लढवत विजय मिळवला होता. यंदा विजयाची हॅट्रीक करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. आमदार राजन साळवी एका पोटनिवडणूकीसह चौथ्यांदा निवडणूक लढवत असून तेही विजयाची हॅट्रीक करण्यासाठी सज्ज झाले आहेत.