1 / 6
पूर्वैकडचं 'स्कॉटलँड म्हणून शिलाँग ओळखल जातं. मेघालयाची राजधानी असलेल्या शिलाँगवर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. पावलोपावली दिसणारे हिरवेगार डोंगर आणि त्यातून खळाळत वाहणारे झरे. इंग्रजांच्या काळातील टुमदार घरं, हवाईदलाचे संग्रहालय. मावलिननॉन्ग, उमियम लेक, एलिफेंट फॉल्स, लैटलम केनयन ही पर्यटनस्थळ पर्यटकांना खुणावतात
केरळमधील इडुकी जिल्ह्यात वसलेले मुन्नार म्हणजे पृथ्वीवरचं अफाट सौंदर्य. 12000 हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या जमिनीवर पसरलेल्या चहाच्या बागा येथील निसर्ग सौंदर्यात अधिकच भर टाकतात. तुम्ही येथे एकटेही फिरू शकता. माट्टूपेटी, चिन्नकनाल, इरविकुलम नॅशनल पार्क, आनामुड़ी शिखर, अनयिंरगल, चहा संग्रहालय ही येथील आकर्षक पर्यटनस्थळ.
गोव्यात फिरण्याची वेगळीच मजा आहे. डोळ्याचे पारणे फेडणारा समुद्र किनारा मासांहारबरोबरच शाकाहाराची रेलचेल हे येतील वैशिष्टय.
कलांगुट समुद्र किनारा, साहसी खेळ, क्रूज़, अगोडा फोर्ट, दूधसागर धबधबा ही येथील वैशिष्ट.
शांत व सुंदर अशा उदयपूरला जाण्यासाठी सोबतीची गरज नाही. येथील मैत्रीपूर्ण निसर्ग तुम्हांला जराही एकटेपणाची जाणीव होऊ देत नाही. य़ेथील
सिटी पॅलेस, जग मंदिर, मान्सून पॅलेस, फतेह सागर लेक, कुंभल गड, सहेलियों की बाड़ी, शिल्पग्राम, विंटेज कार म्यूझियम बघण्यासारखे आहेत.



























































