सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ ग्रिफॉन गिधाडची पहिल्यांच नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलीकडेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगली जयगड भागात गस्त घालत असताना वनरक्षक संतोष चाळके यांनी दुर्मिळ ग्रिफॉन गिधाड हा घिरटय़ा घालणारा पक्षी आपल्या कॅमेऱयात कैद केला. तर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पहिल्यांदाच या दुर्मिळ ग्रिफॉन गिधाडची नोंद झाली आहे.

ग्रिफॉन गिधाड हा पक्षी तिबेट, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान ते हिमालय, नेपाळ, भूतान, पश्चिम चीन आणि मंगोलिया दक्षिणेकडील युरोप, उत्तर आफ्रिका या भागात मुख्यत्वाने आढळतो. येथील पर्वतांमध्ये ते प्रजनन करतात आणि एकच अंडे देतात. हे पक्षी उंच कडय़ांवर आपले घरटे बनवतात.

हा पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करीत असतो. आकाशात उंच घिरटय़ा घालत आपले अन्न शोधत असतो. या पक्ष्याचे इंग्रजी नाव ‘ग्रिफॉन वलचर’ असे आहे. शास्त्राrय नाव ‘गीप्स फुल्वस’ असे आहे. ग्रिफॉन गिधाड हा एक अत्यंत मोठा पक्षी असून, त्याची उंची साधारणपणे 125 सें.मी. आकाराची असते. तर, दोन पंखांची लांबी साधारण 8 ते 9 फुटांपर्यंत असते. नर व मादी ग्रिफॉन गिधाडाचे वजन 8 ते 10 किलोग्रॅमपर्यंत नोंदवले गेले आहे. हा एक दुर्मिळ गिधाड प्रजाती आहे. त्याच्या डोक्यावर पंख पांढरेशुभ्र असतात, तर पाठीवरचे पंख फार रुंद व तांबूस असतात. शेपटीचे पंख हे डार्क चॉकलेटी असतात. इतर गिधाडांप्रमाणे चहास्केवेंजर (कुजलेले व सडलेले मांस खाणारा) पक्षी आहे.

वनरक्षक संतोष चाळके यांनी अधिक अभ्यासासाठी हा फोटो पक्षीतज्ञ व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिला आहे. फोटोमध्ये सदर गिधाडाच्या उजव्या पंखावर नारंगी टॅग लावलेले दिसत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक समाधान चव्हाण, उपसंचालक उत्तम सावंत, सहायक वनसंरक्षक सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी चाळके यांचे या दुर्मिळ नोंदणीसाठी कौतुक केले आहे.

सदर गिधाड हे शास्त्राrय व स्थलांतराच्या अभ्यासासाठी कोणत्या तरी अभ्यासकाने टॅग लावून सोडलेले आहे. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या देशांत गिधाडांवर अभ्यास करणाऱया संशोधकांना व आंतरराष्ट्रीय संस्थांना संपर्क करून त्यांना या नोंदीची माहिती आम्ही कळवली आहे.– रोहन भाटे, पक्षीतज्ञ व मानद वन्यजीव रक्षक