
सामना ऑनलाईन । मुंबई
अभिनेत्याचा जीव हा जेवढा भूमिका वठवण्यात आहे, तितकाच त्या भूमिकेला साजेसा मेकअपमध्ये देखील आहे. बॉलिवूडमध्ये देखील यासाठी चढाओढ लागते. सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमधील ‘सरदार’च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप निर्माण करण्यास यशस्वी ठरलेला सैफ अली खान आता आणखी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या आगामी चित्रपट ‘हंटर’मध्ये तो या नव्या लूकमध्ये दिसणार आहे.
सध्या सैफचे या नव्या भूमिकेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा अभिनेता कोण असा प्रश्न सोबत केला जात आहे. पण ज्या पद्धतीचा मेकअप त्याला करण्यात आला आहे त्यामुळे तो बिलकूलच ओळखता येत नाही. एखाद्या साधू बाबासारखी वाढलेली दाढी, लांबलचक आणि न धुतलेले केस, डोक्याल्या गुंढाळलेलं फडकं, बटण न लावलेला शिकाऱ्याचा शर्ट, मळकं धोतर, अशा पद्धतीचा त्याचा वेश आहे. अनेकजण हे चॅलेंज हरले आहेत, त्यामुळे हा फोटो चर्चेचा विषय ठरला आहे.
summary: saif ali khan in new look in his upcoming movie hunter



























































