800 कोटींचा पतौडी पॅलेस परत विकत घेणार?  सैफ अली खानने दिले हे उत्तर

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आपल्या अभिनयासोबत आपल्या लॅविश लाईफस्टाईलसाठीही ओळखला जातो.  सैफ नुकताच आपल्या कुटुंबींयासोबत पतौडी पॅलेसमध्ये राहून आला आहे. आपल्या कुटुंबींयांसोबत चांगला वेळ घालवल्यानंतर सैफ मुंबईत परतला आहे.

सैफ पटौदी पॅलेसमध्ये शिफ्ट होणार?

सोशल मीडियावर पटौदी पॅलेसचे अनेक फोटो व्हायरल होत आहे. हा पॅलेस अलिशान असून लोकांनाही तो आवडला आहे. आता सैफ बायको करीना आणि मुलगा तैमुरसोबत या पॅलेसमध्ये रहायला जाणार आहे का असा प्रश्न विचारला जात आहे.

यावर सैफ म्हणाला की ही चांगली कल्पना आहे. या पॅलेसमध्ये राहण्याची मजा काही औरच आहे. तसेच आपल्या आई शर्मिला टागोर यांना ही जागा खूप आवडते असे सैफने सांगितले. या पॅलेसमध्ये आपण स्विमिंग करू शकतो, स्वयंपाक करू शकतो, पुस्तकं वाचू शकतो तसेच कुटुंबीयांना जास्त वेळ देऊ शकतो असे सैफने म्हटले आहे.

हा पॅलेस सैफ विकत घेणार

हा पॅलेस सैफ परत विकत घेणार का असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर सैफने उत्तर दिले आहे की हा 800 कोटींचा हा पॅलेस परत मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली होती. हा पॅलेस परत विकत घ्याव लागला नाही कारण तो माझ्याच नावावर आहे, फक्त काही कागदोपत्री काम बाकी होते.

भावनिक नाते

हा पॅलेस 100 वर्षापूर्वी सैफच्या आजोबांनी सैफच्या आजीसाठी बांधला होता. 2011 साली सैफचे वडील मन्सूर अली खान यांचे निधन झाले. त्यानंतर वारसाहक्काने सैफकडे या पॅलेसची मालकी आली. तेव्हा या पॅलेसचा काही भाग हॉटेलसाठी भाडेतत्वार देण्यात आला होता. त्यांनी पॅलेसची चांगली देखभाल केल्याचे सैफने सांगितले.

अलिशान पॅलेस

याच भागात आपल्या पूर्वजांना दफन करण्यात आले आहे, या जागेशी आपले भावनिक आणि अध्यात्मिक नाते असल्याचे सैफने सांगितले. हरयाण राज्यात 10 एकर परिसरात पसरलेल्या या पॅलेसमध्ये तब्बल 150 खोल्या आहेत. त्यात सात बेडरूम, ड्रेसिंग रूम आणि स्विमिंग पूलचाही समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या