‘फुलराणी’ सायना नेहवाल राजकारणाच्या कोर्टात, भाजपमध्ये प्रवेश

706

हिंदुस्थानची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ‘फुलराणी’ सायना नेहवाल हिने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सायनाने काही दिवसांपूर्वीच नागरिकत्व कायद्याचे समर्थन केले होते. त्यानंतर ती भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. भाजपच्या मुख्यालयात भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत सायनाने पक्षात प्रवेश केला.

29 वर्षीय सायना ही मूळची हरयाणाची असून तिने पक्षात प्रवेश केल्यामुळे भाजपला आणखी एक मोठा चेहरा मिळाला आहे. सायना नेहवालच्या नावावर 24 आंतरराष्ट्रीय पदकं जमा आहेत. 2009 मध्ये बॅडमिटंनमध्ये पहिल्या स्थानावर होती तर 2015 मध्ये तिने पहिल्या स्थानावर झेप घेतली होती. सायना नेहवालला आतापर्यंत अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, पद्मश्री व पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या