
‘वाणी बत्रा’ म्हणजेच सध्या थिएटर्समध्ये धुमाकूळ घालणारी अभिनेत्री अनीत पड्डा. पहिल्या चित्रपटात केलेल्या डेब्यूने अनीतने संपूर्ण देशाला भूरळ पाडली. सैयारा या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात करो़डो रुपयांची कमाई केली. या चित्रपटातील ‘वाणी’ म्हणजेच अनीत तिच्या अभिनयाने प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. त्यामुळे आता तिच्या या कलेला आणखी वाव मिळाला असून आता ती ओटीटीच्या व्यासपीठावरही आता आपल्याला दिसणार आहे.
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अनीत पड्डा आता मोठ्या पडद्यावरून OTT वर धुमाकूळ घालायला येत आहे. अमीता ‘न्याय’ या सीरीजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असून, गेल्या वर्षी शूट झालेली ही सिरीज लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अनीतचा हा प्रोजेक्ट ‘सैय्यारा’ चित्रपट साइन करण्यापूर्वी शूट करण्यात आला होता. त्यामुळे आता वर्षभरानंतर एक हिट चित्रपट करून अनीत OTT वर झळकणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘न्याय’ ही एका तरुणीची कथा आहे. जिचे एका नेत्याकडून लैंगिक शोषण होते आणि ती न्यायालयात त्याच्याविरुद्ध न्यायासाठी लढते. या सिरीजमध्ये अनीत एका 17 वर्षीय पीडितेची भूमिका साकारत आहे. तसेच या सिरीजमध्ये अभिनेत्री फातिमा सना शेख एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. याशिवाय अभिनेते अर्जुन माथूर एका वकिलाची भूमिका साकारत आहे.




























































