अँग्री यंग मॅन! बॉलीवूडच्या लोकप्रिय सलीम-जावेद जोडीवर माहितीपट

‘शोले’, ‘डॉन’, ‘जंजीर’, ‘दीवार’, ’यादों की बारात’, ’त्रिशूल’ अशा सुपरहिट चित्रपटांसाठी पटकथा-संवादलेखन करणाऱया बॉलीवूडच्या लोकप्रिय सलीम-जावेद या जोडीवर लवकरच माहितीपट येणार आहे. विशेष म्हणजे सलीम-जावेद यांच्या मुलांनीच यासाठी पुढाकार घेतला आहे. सलमान खान, फरहान आणि झोया अख्तर याची निर्मिती करणार आहेत.

‘अँग्री यंग मॅन’ असे या माहितीपटाचे नाव आहे. त्यासाठी सलमान खान फिल्म्स, एक्सेल एंटरटेनमेंट आणि टायगर बेबी फिल्म्स यांनी पुढाकार घेतल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्किटद्वारे दिली आहे. नम्रता राव दिग्दर्शित या माहितीपटामध्ये या दोन्ही दिग्गज लेखकांचा प्रकास उलगडण्यात येईल. कशा प्रकारे त्यांनी बॉलीवूडला वेगळ्या उंचीकर नेऊन ठेवले, हे यात दाखवण्यात येईल. विशेष म्हणजे यातील माहिती आतापर्यंत कुठे ऐकली किंवा वाचलेली नसेल.

सलीम-जावेद या जोडीने लेखक म्हणून बॉलीवूडला सुमारे 22 चित्रपट दिले आहेत. अर्ध्याहून अधिक चित्रपट बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत आहेत.

बिग बी यांना सुपरस्टार बनवण्यात या जोडीचा मोठा वाटा आहे. त्यांच्या चित्रपटांमुळेच बिग बी यांना ‘अँग्री यंग मॅन’ अशी ओळख मिळाली होती. सलीम-जावेद ही जोडी फुटली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला होता. मात्र या माहितीपटाच्या निमित्ताने ही जोडी बऱयाच वर्षांनी एकत्र येत आहे. पुढच्या वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा माहितीपट पाहायला मिळेल अशी चर्चा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या