Samantha prabhu marriage – समांथा प्रभूने केले दुसरे लग्न, फोटो शेअर करत दिली माहिती

घटस्फोटाच्या चार वर्षानंतर साऊथची सुपरस्टार समांथा प्रभू पुन्हा एकदा लग्नाच्या बंधनात अड़कली आहे. ‘द फॅमिली मॅन’चे दिग्दर्शक राज निदिमोरु यांच्याशी तिने लगीनगाठ बांधत सगळ्यांनाचा आश्चर्याचा धक्का दिला आहे. आता लग्नाचे फोटोही समांथाने सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.

अभिनेत्री समांथा रूथ आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांचे लग्न झाले आहे. समांथा यांनी इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे अधिकृतपणे या बातमीला दुजोरा दिला. समांथाचे लग्न 1 डिसेंबर रोजी सकाळी कोयंबटूरमध्ये ईशा योगा सेंटरमध्ये पार पडले.  तिच्या या निर्णयाने चाहते सुखावले असून तिच्यावर अभिनंदनाचा पाऊस पाडत आहेत. हे लग्न फार खासगी ठेवले होते. या लग्नात जवळचे नातेवाईक मित्रपरिवार असे साधारण 30 माणसं सहभागी होती. यावेळी समांथाने लाल रंगाची साडी नेसली होती. दोघेही त्यांच्या पोशाखात अतिशय सुंदर दिसत होते. समंथाने लाल आणि सोनेरी रंगाची रेशमी साडी नेसली असून पारंपारिक सोन्याच्या दागिन्यांनी सजली आहे. तिने गजऱ्यांनी सजवलेला सुंदर अंबाडा घालून आपले केस स्टाईल केले आहेत. राज निदिमोरूने पांढरा कुर्ता आणि पायजमा घातला होता आणि त्यावर बेज रंगाचे नेहरू जॅकेट घातले होते.

समांथाचा ईशा सेंटर आणि त्याचे संस्थापक जग्गी वासुदेव यांच्या कार्यक्रमांशी चांगले संबंध आहेत. म्हणूनच तिने तिच्या लग्नासाठी हे ठिकाण निवडले. “द फॅमिली मॅन” पासून त्यांची मैत्री सुरू झाली. त्यानंतर त्यांनी “सिटाडेल: हनी बनी” मध्ये एकत्र काम केले. दोघांनी अलीकडेच “त्रालाला पिक्चर्स” नावाचे एक प्रोडक्शन हाऊस सुरू केले आणि राजने “शुभम” सारख्या चित्रपटांसाठी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणूनही काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

 नागा चैतन्य आणि सामंथा प्रभू यांचा चार वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. लाडकं कपल वेगळं झाल्याने चाहत्यांच्या काळजात चर्र झाल. अशातच नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालसोबत लग्नगाठ बांधली आणि चाहत्यांना समांथाची काळजी वाटू लागली होती. मात्र आता समांथाच्या लग्नाच्या बातमीने चाहते खुश झाले असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.