
संभाजी ब्रिगेडचे संस्थापक, सचिव व बुलढाणा जिल्हाध्यक्ष यांनी मंगळवारी खासदार प्रतापराव जाधव यांच्याहस्ते शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला. संभाजी ब्रिगेडचे संस्थापक सचिव प्रदीप बिलोरे (सिंदखेडराजा) व संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवाजीराव गव्हाड(सिंदखेडराजा) यांनी मंगळवारी शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम खासदार प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी झाला. यावेळी युवा सेना जिल्हा अधिकारी ऋषी जाधव, गणपतराव रहाटे, नगरसेवक राजेंद्र आढाव,नितीन राऊत,पप्पु जौंजाळ, बाळू जाधव व व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. या प्रवेशामुळे सिंदखेडराजा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले असून शिवसेनेची ताकद वाढली आहे.


































































