संभाजीनगर जिल्ह्यात आज 26 रुग्णांची वाढ, 468 रुग्णांवर उपचार सुरू

534

संभाजीनगर जिल्ह्यात आज सकाळी 26 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1569 झाली आहे. यापैकी 1029 कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 72जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 468 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

नवी वस्ती, जुना बाजार (2), चिस्तीया कॉलनी (2), गुरुगोविदसिंगपूरा (1), एन आठ सिडको (2), भवानी नगर (4), शिवशंकर कॉलनी (1), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर (2), आझम कॉलनी (4), एन सहा सिडको (1), युनूस कॉलनी (1),मुकुंदवाडी (1), मिसरवाडी परिसर (1), नारेगाव (1), रेहमनिया कॉलनी (1), वैजापूर (2) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 13 महिला आणि 13 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या