शिवसेना शेतकऱयांच्या पाठीशी ठाम उभी-दिवाकर रावते

264

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर सुरू करण्यात आलेल्या संभाजीनगरमधील मदत केंद्राला मंगळवारी शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी भेट दिली. संभाजीनगरमधील गंगापूरमधील मदत केंद्राला भेट देऊन रावते यांनी शेतकऱयांच्या पाठीमागे शिवसेना ठामपणे उभी असल्याचा निर्वाळा दिला.

राज्यातील अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱयांना सहाय्य करण्यासाठी राज्यात शेतकरी मदत केंद्रे सुरू करण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 17 नोव्हेंबरला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी दिले. त्यानंतर दिवाकर रावते त्वरित 18 नोव्हेंबरला संभाजीनगरला रवाना झाले. शिवसेनेने गंगापूर तालुक्यात सुरू केलेल्या शेतकरी मदत केंद्राला दिवाकर रावते यांनी भेट दिली आणि शेतकऱयांशी संवाद साधला. पिकांचे पंचनामे झाले आहेत का, पीक कर्ज माफ झाले का, कर्जमाफीचा लाभ झाला का याची माहिती त्यांनी घेतली. शेतकऱयांच्या अडचणीही समजून घेतल्या. राज्य सरकारची मदत सर्वांपर्यंत पोहोचेल यासाठी शेतकरी मदत केंद्रातर्फे शिवसैनिक सहकार्य करतील, असे आश्वासन रावते यांनी यावेळी दिले.

कोल्हापूरमधील पूरग्रस्त शेतकऱयांना दिला धीर

कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरात शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे या नैराश्यातून  शिरढोण, ता. शिरोळ येथील शेतकरी तुकाराम माने आत्महत्या करून त्याने जीवनयात्रा संपविली. शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी माने कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली. तसेच पूरग्रस्तांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करण्यात येईल, असे सांगत त्यांनी शेतकऱयांना धीर दिला. यावेळी कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष वैभव उगळे, दत्तात्रय कामत, चंद्रकांत मोरे आदी प्रमुख पदाधिकाऱयांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या