भाजपा, अजित पवार गटाकडून शिंदे गटाला ठेंगा

नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि अजित पवार गटाने महायुतीतील शिंदे गटाला ठेंगाच दाखविला आहे. अजित पवार गटाच्या समीर भुजबळ यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीनंतर महाजन यांनी नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीत आवश्यक तेथे मैत्रिपूर्ण लढत देऊ, असे स्पष्ट केले. येवला, नांदगाव, मनमाडमध्ये ताकद नसल्याने शिंदे गटाला बरोबर घेण्याचा प्रश्नच नाही, असे माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितले.