
दक्षिण कोरियाची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग आपला नवीन Galaxy M12 फोन हिंदुस्थानी बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. 7000 mAh ची दमदार बॅटरी असणारा हा हिंदुस्थानातील कंपनीचा दुसरा स्मार्टफोन आहे. याआधी कंपनीने Galaxy M51 मध्ये 7000 mAh ची बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंचवर पाहिला गेला होता. यापूर्वी फोनचे काही फोटोही लीक झाले होते.
रॅम्प आणि प्रोसेसर
मिळालेल्या माहितीनुसार, यात कंपनी Exynos 850 प्रोसेसर आणि 3 जीबी रॅम्प देऊ शकते. हा फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. यात कंपनी 2.4 गीगाहर्ट्झ वायफाय, ब्लूटूथ 5.0 देऊ शकते.
मिळणार 7000mAh ची बॅटरी
Galaxy M12 मध्ये 6.7 इंच डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ज्यात सेल्फी कॅमेरा आणि पल-हॉल डिझाइन दिली जाऊस शकते. या स्मार्टफोनची खास गोष्ट म्हणजे यात देण्यात येणारी बॅटरी आहे. कंपनी यात 7000mAh ची बॅटरी देणार आहे. तसेच यात यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमीचा हेडफोन जॅक उपलब्ध असेल.
कधी होणार लॉन्च?
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, Galaxy M12 ची किंमत 20 हजार ते 25 हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते. डिसेंबरच्या अखेरीस हा फोन हिंदुस्थानात लॉन्च होऊ शकतो.




























































