
सामना ऑनलाईन । संभाजीनगर
दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येत कुठल्याच संस्थेचे नाव पुढे आले नसताना जाणीवपूर्वक हिंदुत्ववाद्यांवर कारवाई केली जात आहे. याच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये सनातन संस्थेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. तसेच जाणीवपूर्क सनातन संस्थेचे नाव घेतले जात असून कुठल्याच साधकाला अटक केलेली नाही, त्यामुळे सनातनची नाहक बदनामी होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
या मोर्चात हिंदू जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी सेना, हिंदू विधिज्ञ परिषद, बजरंग दल आदिंसह हिंदुत्ववादी संघटना सामील झाल्या होता. आम्ही सारे सनातन, हिंदूची बदनामी बंद करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता सुरेश कुलकर्णी आणि हिंदू जनजागृती समितीच्या प्रियंका लोणे यांनी उपस्थित आंदोलकाना संबोधित केले.



























































