
परभणीत वाळू तस्करी करणारा टिप्पर पलटला आहे. गाडी पलटल्यानंतर चालक फरार झाला आहे.
पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील गोदावरी नदीपात्रातून उत्खनन केलेल्या चोरट्या वाळूची वाहतूक करीत मुख्यमार्गाने लपून जाण्याच्या उद्देशाने गौर गावाकडे जात होता. गौर गावाच्या शहिद सदाशिव नागठाणे स्वागत कमानी जवळ पलटला.
दरम्यान रेतीने भरलेला हा टिप्पर पलटी होताच टिप्पर चालक फरार झाला. दरम्यान तालुक्यातील पूर्णा-गोदावरी नदीपात्रातून आजही दिवसा ढवळ्या मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असल्यांच्या प्रकरणाला बिंग आज फुटले.
तालुक्यातील पूर्णा-गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या चोरट्या वाळूचे उत्खनन करून या चोरट्या वाळूची असंख्य टिप्पर-ट्रेक्टर मधून तस्करी केल्या जात आहे. अशी चोरट्या रेतीची तस्करी करणारी वाहने सुसाट वेगाने धावून मिळालेल्या ऑर्डरच्या ठिकाणी अर्थात आपल्या ठराविक क्षेत्रात वाळू टाकण्याच्या उद्देशाने वाहन पळवत असल्याने परिसरातील जनसामान्यांच्या जिवीताला धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास येत असून आहे. अशा प्रकारचे एक टिप्पर आज पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून टिप्पर चालक मात्र फरार झाला आहे.


























































