‘संगमनेर सेवा समिती’चे वर्चस्व, नगराध्यक्षपदी डॉ. मैथिली तांबे विक्रमी मतांनी विजयी

संगमनेर नगरपरिषद निवडणूक अखेर तांबे-थोरात परिवाराने ऐतिहासिक बहुमताने जिंकत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत ‘संगमनेर सेवा समिती’ अर्थात ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकने विरोधकांचा सुपडा साफ केला. नगराध्यक्षपदासाठी डॉ. मैथिली तांबे यांनी 16 हजार 408 विक्रमी मतांनी विजय मिळवला.

नगरसेवकपदाच्या निवडणुकीतही संगमनेर सेवा समितीने आपले वर्चस्व कायम ठेवत 27 नगरसेवक निवडून आणले. शिंदे गटाचा केवळ एक, तर दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत तांबे-थोरात विरुद्ध खताळ-विखे असा थेट राजकीय सामना पाहायला मिळाला. संगमनेरच्या मतदारांनी पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला.

विजयी उमेदवार ः सीमा खटाटे, दिलीप पुंड, भारत बोऱहाडे, अर्चना दिघे, सौरभ कासार, शोभा पवार, प्राची कवडे, किशोर पवार, अनुराधा सातपुते, विश्वास मुर्तडक, वनिता गाडे, गजेंद्र अभंग, मालती डाके, नितीन अभंग, दीपाली पंचारिया, श्रीगणेश गुंजाळ, अमजदखान पठाण, विजया गुंजाळ, शकिला बेग, नूरमोहम्मद शेख, सरोजना पगडाल, शाहनवाज खान (डॉ. दानिश), किशोर टोकसे, प्रियंका शाह, शैलेश कलंत्री, नंदा गरुडकर, मुजिबखान पठाण (लाला) (सर्व संगमनेर सेवा समिती),  साक्षी सूर्यवंशी (शिंदे गट), योगेश जाजू, दिलशाद शेख (अपक्ष)