
कोरोना साथी बरोबरच डेल्टा प्लस व्हेरीअंटचे बाधित सापडलेल्या जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात कसबा, माभळे, नावडी, धामणी व कोंडगाव या ठिकाणी लसीकरण मोहीम वेगाने करा, अशा सूचना शासनाकडून त्या त्या प्रशासनाला करण्यात आल्या व त्यातील कसबा या गावी लसीकरण मोहीम राबवण्यात आली.
कोरोनाची साथ चालू असतानाच अशा परिस्थितीत कोरोनाचाच नवा डेल्टा प्लस व्हेरीअंट अधिक गंभीर स्वरूपात पुढे आला व या खतरनाक डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण संगमेश्वरातील धामणी, नावडी , माभळे, कसबा व कोंडगाव या गावांमध्ये सापडताच जिल्हाधिकारीनी कंटेनमेंट झोन जाहीर केला. व कडक निर्बंध लागू केले या कडक निर्बंधांमुळे जनतेला अनेक समस्या निर्माण झाल्या येथील रुग्ण संख्या कमी येताच या पाच गावातील कंटेनमेंट झोन उठविण्यात आला.
येथील स्थानिक ग्रामस्थ या कोरोनाच्या साथीमुळे लसीकरणासाठी अधिक जबाबदार नागरिक झाले. माझे कुटुंब – माझी जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलल्याप्रमाणे कोरोनाच्या साथीला मुकाबला करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कोंड उमरे अंतर्गत कसबा उपकेंद्रात लसीकरणाला येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रत्यक्षदर्शीनी 150 डोस असताना येथे अनेक नागरिकांनी लस घेण्यासाठी आपली उपस्थिती दर्शवली. कसबा येथील सरपंच व ग्राम कृती दलाचे सर्व कर्मचारी येथील आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेवक संदीप ढेकणे कोरोना महामारीत खूप अपार मेहनत घेऊन लोकांचे आरोग्य अबाधित राखण्याचे काम करीत आहेत. स्वॅब घेणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कोरोना रुग्ण सीसीमध्ये दाखल करणे इत्यादी सर्व कामे आदी आरोग्याचे सर्व राष्ट्रीय कार्यक्रम उत्तम रित्या सेवा देऊन पार पाडत आहेत.
या लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसन्न लिंगायत, आरोग्य सेवक संदीप ढेकणे ,आरोग्य सहायीका श्रीम गीता हुले आरोग्य सेविका श्रीमती सुनीता यादव शिक्षण विभागाचे शिक्षक कारभारी वाडेकर, अनिल जाधव, राजेंद्र कदम आशा स्वयंसेविका श्रीमती पल्लवी बोंडकर , वनिता कदम, दीपाली साळवी, तुलसी साळवी व अंगणवाडी सेविका साधना लिंगायत यांच्या सर्व सेवेमुळे व त्यांच्या कर्तव्यामुळे येथील लसीकरणाचा कार्यक्रम अगदी उत्तम रित्या पार पडला.
























































