संगमेश्वर तालुक्यातील कुंडी येथील एकाच घरातील तिघांना कोरोनाची लागण

संगमेश्वर तालुक्यात गेले दोन दिवस कोरोना बाधितांचा आकडा स्थिर असताना सोमवारी यामध्ये तीन रूग्णांची भर पडली आहे. कुंडी बौद्धवाडी येथील एकाच घरातील तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. तीनही बाधित रूग्णांवर रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

बाधित रूग्णांच्या घरातील एक महिला प्रसुतीसाठी मुंबईहून पंधरा दिवसांपुर्वी कुंडी बौद्धवाडी येथे आली होती. रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात या महिलेची प्रसुती झाली. यानंतर घरातील काही व्यक्तींना सर्दी, खोकला त्रास जाणवू लागल्याने घरातील 5 व्यक्तींचे स्वब नमुने घेण्यात आले होते. याचा अहवाल रात्री आरोग्य विभागाला प्राप्त झाला.

यामध्ये प्रसुती झालेल्या महिलेसह पती व नणंद या तिघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तींच्या सानिध्यातील असलेल्यांचे मंगळवारी स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या