
तालुक्यात कोळंबे पाठोपाठ कुळे व देवोळे धनगरवाडीत भूस्खलन झाले असून 5 घरे खचली आहेत. घरांच्या भिंती कोसळल्या असून रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे . धनगरवाडीला जोडणारा 500 मीटर रस्ता खचल्याने वाड्यांचा संपर्क तुटला आहे . मुसळधार पावसामुळे नायरी व आरवली घाटातील डोंगर खचला आहे .
5 दिवसांपूर्वी कोळंबे आंबेकरवाडीत मोठे भूस्खलन होऊन येथील शेतीला धोका पोहोचला होता आता कुळे व देवोळे धनगरवाडीत भूस्खलन झाल्याने येथील घरांना धोका पोहोचला आहे . वाड्यांना जोडणाऱ्या रस्ता 500 मीटर खचला असून रस्त्याला भेगा पडल्या आहेत . शेतीमध्येही भूस्खलन झाले असून शेतीचे मोठे नुकसान झाले . 5 घरांना धोका निर्माण झाल्याने ग्रामस्थांचे शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे . भूस्खलनामध्ये वाडीतील काशिराम गंगाराम शेळके , सखाराम शेळके , धोंडू शेळके , पशुराम शेळके , यशवंत शेळके , तुकाराम शेळके , बाबू शेळके , राजाराम शेळके , रमेश शेळके , पांडुरंग शेळके , शांताराम शेळके , सुनंदा शेळके , काशिराम शेळके , सावित्री शेळके यांचे नुकसान झाले . घरांना धोका निर्माण झाला असल्याचे समजल्यानंतर देवोळे व कुळे धनगरवाडीत जि .प.सदस्या माधवी गीते यांनी भेट देवून पाहणी केली . यावेळी मनोहर गीते , शिवसेना विभागप्रमुख राजू साळवी , देवोळे सरपंच व कुळे सरपंच यावेळी उपस्थित होते



























































