अखेर बिबट्या जेरबंद; भक्ष्याचा पाठलाग करतांना बिबटया विहीरीत पडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील आंबवली पाष्टेवाडी येथे भक्षाचा पाठलाग करतांना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना रविवारी रात्री घडली. बिबट्या विहिरीत पडल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी वन विभागा जवळ संपर्क साधला. वन विभागाचे अधिकारी आंबवली पाष्टेवाडीमध्ये दाखल झाले. एक तासाच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला पिंजऱयात बंद करण्यात वन विभागाला यश आले.

विभागीय वनाधिकारी रमाकांत भवर यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने ही मोहीम फत्ते केली. या बिबटयाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले. या मोहिमेत ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. पाच वर्षे वाढीचा हा नर जातीचा बिबटया होता. यावेळी परिक्षेत्र वनाधिकारी प्रियांका लगड, वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक नानू गावडे, मिलींद डाफळे, शर्वरी कदम आदि यावेळी उपस्थित होते.