संजय पाटलांनी सोमय्यांची शायनिंग उतरवली

सोमवारी दुर्घटना घडल्यानंतर आज भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी प्रसारमाध्यमांचा गराडा घेऊन प्रवेश केला. यामुळे बचावकार्यात मोठा अडथळा निर्माण होऊ लागला. याच वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या संजय दिना पाटील यांनी किरीट सोमय्यांची शायनिंग चांगलीच उतरवली. सोमय्या थेट कॅमेऱयासह बचावकार्याच्या ठिकाणी गेल्याने बचावकार्य काही काळ बंदही झाले. यावेळी ‘तुम्हाला घटनास्थळी जायला कुणी सांगितले?, काम करणारी माणसे आहेत ना?, तुम्हाला पॅमेरा घेऊन आत कशाला जायचे आहे?’ असा सवाल करीत संजय दिना पाटील यांनी सोमय्यांना धारेवर धरले.  त्यामुळे तंतरलेल्या सोमय्यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला.