हे निर्लज्ज राजकारण; हिशेब चुकते होतील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र पेटलाय तरी यांचे निर्ल्लज्ज राजकरण सुरूच आहे. मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली. त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही. शिवसेनेचे 16 आमदार व 6 खासदार आहेत. सर्वेच्च न्यायालयात खटला सुरू आहे. एक आमदार असलेल्यांना आमंत्रण. एकही आमदार नाही अशांनादेखील बोलावले ,पण शिवसेना यांच्या डोळ्यात खुपते, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावले. ठीक. आम्हाला मानपान नको, पण प्रश्न सोडवा. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवा, असे नमूद करत घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच आहे. हिशेबाचे वेळ जवळ येत आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.