सरकारकडून जरांगे पाटलांचे आंदोलन फोडण्याचा प्रयत्न होत आहे, संजय राऊत यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे उपोषणाचा बारावा दिवस असून अद्याप राज्य सरकार यावर तोडगा काढू शकलेले नाही. जरांगे पाटील हे त्यांच्या मागण्यांवर ठाम असून सरकारकडून देण्यात आलेले प्रस्ताव त्यांनी धुडकावून लावले आहेत. मराठा आऱक्षणासोबतच सध्या ओबीसी व धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणीही होत आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या सध्या आरक्षणावरून सुरू असलेल्या राज्य सरकारच्या राजकारणावर टीका केली आहे. राज्य सरकारचे मराठा आंदोलन मोडून काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

”जरांगे पाटील हा फाटका माणूस आहे. जेव्हा फाटकी माणसं आंदोलनात उतरतात आणि एखादी गोष्ट मनाशी ठरवतात तेव्हा त्यांना त्यांच्या विचारापासून दूर करणं कठीण असतं. सरकारकडून त्यांचं आंदोलन फोडण्याचे प्रयत्न होत आहेत. वेगेवगळ्या समाजाची लोकं उभी केली जात आहेत. पण जे चित्र मला दिसत आहे. तुम्ही कितीही आंदोलन फोडण्याचा प्रयत्न केला तरी ते आंदोलन फुटणार नाही”, असे संजय राऊत म्हणाले.