
आज ठाण्यातील शिवजयंती सोहळ्यास शिवसेना नेते, खासदार संजय राऊत उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा व्हावी अशी तेथील कार्यकर्त्यांची इच्छा असून भविष्यात ही सभा झालीच तर ती महाराष्ट्रातील रेकॉर्डब्रेक सभा होईल असे त्यांनी सांगितले.
”आता तुम्ही इथे निवडणूका घ्या. तुम्हाला समजेलच की जनता व शिवसैनिक कुणासोबत आहेl. ठाणे कुणाची खासगी संपत्ती नाही. कुणी सत्तेत असेल, मंत्री असेल, कुणी मुख्यमंत्री असेल, केंद्रात मंत्री असेल. त्यांच्यामागे शिवसेना नाही जात. आपण जी इथे पाहतोय ती खरी शिवसेना आहे. ज्या प्रमाणे खेड, मालेगाव, यवतमाळला विराट सभा होत आहेत. भविष्य़ात ठाण्यात देखील शिवसेना पक्षप्रमुखांनी विराट सभा घ्यावी ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. इथलं वातावरण मला असं सांगतंय. की जेव्हा उद्धव ठाकरे इथे येतील तेव्हा महाराष्ट्रातील रेकॉर्डब्रेक सभा इथे होईल”, असं संजय राऊत म्हणाले.





























































