तो बूट सरन्यायधीशांवर नाही तर संविधानावर फेकायचा प्रयत्न झालाय – संजय राऊत

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी सुरू असताना एका वकिलाने ‘सनातन का अपमान नही सहेगा हिंदुस्थान’ अशा घोषणा देत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ANI शी बोलताना भाजपवर जोरदार टीका केली.

”तो बूट सरन्यायधीशांवर नाही तर आपल्या संविधानावर फेकायचा प्रयत्न झालाय. सध्या सत्तेवर तेच लोकं आहेत जे संविधानाला मानत नाहीत व हे हल्लेखोर त्यांचेच चेलेचपाटे आहेत” अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे.

भाजपचे बेगडी हिंदुत्व

सोमवारी या हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विटरवरून तत्काळ आपली संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली. ””सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश भुषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा प्रयत्न हा डॉ आंबेडकर आणि संविधानावरील थेट हल्ला आहे! हल्लेखोर बेगडी हिंदुत्ववादी आहेत व भाजपच्या प्रशिक्षण केंद्राची ही निर्मिती आहे”, असे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.