
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी नाशिक कुंभमेळ्यातील CCTV प्रोजेक्टच्या कामाबाबत एक मोठा दावा केला आहे. ”नाशिक कुंभमेळ्याचे सीसीटीव्ही प्रोजेक्टचे काम ठाणे शहराचे काम ज्या कंपनीकडे आहे त्याच कंपनीला देण्यात आले असून त्यासाठी मॅट्रिक्सला 300 कोटी तरतूद असलेलं टेंडर 293 कोटींना म्हणजेच सहा कोटी कमी मध्ये मिळाले आहे”असे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.
”नाशिक कुंभमेळा CCTV project चं काम 294 कोटींना Matrix या कंपनीला मिळालं. हे काम महाराष्ट्र नगरविकास मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. योगायोग असा, की याच कंपनीला ठाणे शहराचं CCTV project मिळालं होतं. त्याहुन योगायोग असा, की ठाणे CCTV चं रिक्वेस्ट फॉर प्रपोजल जसंच्या तसं नासिक कुंभ मेळ्या साठी कॉपी पेस्ट केलं गेलं होतं. ईवाय कन्स्लटंटनी नुसत्या कॉपी पेस्टचे पैसे आकारले. गंमत अशी. . . . 300 कोटी तरतूद केलेलं टेंडर 293,94,00,000/- किमतीत matrix नी घेतलं. फक्तं 6 कोटींनी कमी”, असा दावा संजय राऊत यांनी या पोस्टमधून केला आहे.
सोबत ”दिन दिन दिवाळी, सगळ्यांना कंत्राटदार ओवाळी, सरकार कोणाचे, कंत्राटदारांचे. दिन दिन दिवाळी”, असेही ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.




























































