
ठाण्यातील मनोरमा नगर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भव्य शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज उपस्थिती लावली. या कार्यक्रमात हजारो शिवसैनिक हजर राहिले होते. या शिवजयंती कार्यक्रमातील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून ठाणे हे शिवसेनेचेच असल्याची खात्री पटल्याची प्रतिक्रीया संजय राऊत यांनी दिली आहे.
ठाण्यातील मनोरमा नगर येथे शिवसेना आयोजित भव्य शिवजयंती उत्सवास उपस्थित राहिलो.शिवसैनिक व जनतेचा उत्साह जोरदार होता खा.राजन विचारे यांचे नियोजन उत्तम .ते निर्भयपणे काम करीत आहेत.
ठाणे शिवसेनेचे
शिवसेना ठाण्याची.
याची पुन्हा खात्री पटली.
ठाण्यातील बुडबुडे लवकरच फुटतील. हे नक्की! pic.twitter.com/obWdv5WF5p— Sanjay Raut (@rautsanjay61) March 10, 2023
”ठाण्यातील मनोरमा नगर येथे शिवसेना आयोजित भव्य शिवजयंती उत्सवास उपस्थित राहिलो.शिवसैनिक व जनतेचा उत्साह जोरदार होता खा.राजन विचारे यांचे नियोजन उत्तम .ते निर्भयपणे काम करीत आहेत. ठाणे शिवसेनेचे शिवसेना ठाण्याची. याची पुन्हा खात्री पटली. ठाण्यातील बुडबुडे लवकरच फुटतील. हे नक्की!” असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.



























































