
केएफसी आणि पिझ्झा हट सारखी फूड आउटलेट चालवणाऱ्या ‘सफायर फूड्स इंडिया’चा आयपीओ आजपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. गुंतवणूकदार 11 नोव्हेंबरपर्यंत यात गुंतवणूक करू शकतात. यानंतर यासाठीची प्रक्रिया बंद करण्यात येईल.
कंपनीला आपल्या प्रारंभिक ऑफरद्वारे (IPO) सुमारे 2,073 कोटी रुपये उभे करायचे आहेत. तुम्हाला केएफसी, पिझ्झा हट सारख्या रनिंग आउटलेटमध्ये सहभागी व्हायचे असेल, तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. सफायर फूड्सने त्यांच्या आयपीओसाठी 1,120 ते 1,180 रुपये किंमत निश्चित केली आहे. यासाठी तुम्ही कमीत कमी 12 शेअर्सच्या लॉटमध्ये गुंतवणूक करू शकता. म्हणजेच तुम्हाला किमान 13,440 रुपये गुंतवावे लागतील. लहान गुंतवणूकदार जास्तीत जास्त 14 लॉटसाठी अर्ज करू शकतात.
कधी होणार लिस्टिंग?
कंपनी 22 नोव्हेंबर रोजी आपल्या आयपीओ अंतर्गत शेअर्सची यादी तयार करण्याचा विचार करत आहे. या अंतर्गत, प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांचे सुमारे 1.75 कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत ठेवण्यात आले आहेत. त्याचे प्रवर्तक QSR मॅनेजमेंट ट्रस्ट आणि सफायर फूड्स मॉरिशस अनुक्रमे 8.50 लाख आणि 55.69 लाख शेअर्स विकतील.
दरम्यन, सफायर फूड्स सध्या एकूण 450 रेस्टॉरंट चालवते. ही कंपनी श्रीलंका आणि मालदीवमध्ये मिळून 231 पिझ्झाहट दालनांचे संचालन करते. केएफसी, पिझ्झा हट व्यतिरिक्त, कंपनी टॅको बेल ब्रँड रेस्टॉरंट्स देखील चालवते आणि चिकन, पिझ्झा, मेक्सिकन फूडमध्ये आघाडीवर आहे.
































































