हजारो भाविकांनी घेतले गहिनीनाथाचे दर्शन

12

सामना प्रतिनिधी । सिल्लोड

दरवर्षीप्रमाणे सकाळी तखतराव व मल्लखांबाच्या प्रदक्षिणेने सारोळ्याच्या यात्रेला सुरुवात झाली. सारोळा, वाकडी, लिहाखेडी, जानेफळ, रदीमाबाद व आजूबाजूच्या गावांच्या भाविकांनी नवस पूर्ण केले. तर काही भाविकांनी बैलांची प्रदक्षिणा घालून नवस पूर्ण केले. यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेतले.

यात्रेत ठिकठिकाणी हॉटेल व प्रसादांची दुकाने सजली होती. तर काही ठिकाणी लहान मुलांच्या खेळण्यांची दुकाने थाटली होती. मोठमोठे रहाटपाळणे यात्रेतील लोकांचे लक्ष वेधून घेत होते. दर्ग्याच्या व मंदिराच्या भोवती तीस-चाळीस एकराच्या परिसरात भाविकांनी बैलगाड्या सोडल्या होत्या. सजवलेले वेगवेगळे बैल बाशिंग बांधून साजासहित यात्रेत आणले होते. दुष्काळाचे सावट असल्यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी भाविकांचा प्रतिसाद कमी प्रमाणात दिसून आला. दिवसभरात ८० ते ९० हजार भाविकांनी गैबनशाहवली व गहिनीनाथाचे दर्शन घेतले. दुपारी दोन वाजता वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे मुख्य रस्ता जाम झाला. यावेळी पोलिसांनी रस्ता मोकळा केला.

आपली प्रतिक्रिया द्या