देवगड तालुक्यात सरपंचपदाची निवडणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगड तालुक्यातील 38 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली असून 16 ग्रामपंचायतींचे उपसरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. यातील 22 उपसरपंच पदांवरती भाजपाने दावा केला असून 12 उपसरपंच पदावरती शिवसेनेने दावा केला आहे.

देवगड तालुक्यामध्ये पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकिमध्ये ग्रामपंचायतीनिहाय विजयी झालेले उपसरपंच पुढीलप्रमाणे –
बापर्डे विवेक वेदु्रक, विजयदुर्ग रियाझ काझी, गिर्ये मनस्वी गावकर, महाळुंगे भक्ती घाडीगावकर, ओंबळ प्रवीण पवार, पेंढरी गुरुनाथ गुरव, सौंदाळे विष्णू राणे, पडेल विश्वनाथ पडेलकर, उंडिल जयेश नर, वाघिवरे वेळगिवे सहदेव लाड, वाघोटन प्रकाश पडेलकर, गवाणे सागर गोरुले, गोवळ सत्यवान जंगले, कुणकवण मंगेश गुरव, पाटगाव संदीप गुरव, बुरंबावडे प्रकाश आडिवरेकर, मणचे मन्सुर सोलकर, नाद मंगेश तेली, फणसे जितेंद्र थोटम, पोंभुर्ले सादिक डोंगरकर, चांदोशी समीर मिराशी, हडपीड दाजी राणे, सांडवे राजू वरक, तोरसोळे सुहास पवार, कुवळे प्रदोष प्रभूदेसाई, दहिबांव देवानंद खोत, किंजवडे विनय पाडावे, कोटकामते गणेश घाडी, मिठमुंबरी गुरुनाथ गावकर, नारिंग्रे महेश जंगले, पोयरे समीर तावडे, आरे रत्नदिप कांबळे, चाफेड महेश राणे, कट्टा गणेश करंगुटकर, दाभोळे प्राची बर्वे, खुडी शशिकांत कावले, हिंदळे रुपेश राणे, साळशी कैलास गावकर भाजपाने बापर्डे, विजयदुर्ग, गिर्ये, महाळुंगे, ओंबळ, पेंढरी, वाघिवरे

वेळगिवे, वाघोटण, कुणकवण, पाटगाव, नाद, चांदोशी, हडपीड, सांडवे, कुवळे, किंजवडे, कोटकामते, नारिंग्रे, पोयरे, आरे, कटटा, दाभोळे या 22 ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदावरती दावा केला आहे, तर शिवसेनेने खुडी, हिंदळे, पोयरे, तोरसोळे, मिठमुंबरी, बुरंबावडे, मणचे, नाद, पोंभुर्ले, उंडिल, फणसे, गोवळ या 12 ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदावरती दावा केला आहे, तर पडेल ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी महाविकास आघाडीचे विश्वनाथ पडेलकर यांची निवड झाली आहे, तर चाफेड साळशी आणि गवाने या तीन ग्रामपंचायतीवरती गावपॅनलचे उपसरपंच विराजमान झाले आहेत. तालुक्यात 38 ग्रामपंचायतींपैकी आरे, बुरंबावडे, चांदोशी, दहिबांव, गोवळ, हडपीड, कटटा, कुवळे, मणचे, नारिंग्रे, ओंबळ, पेंढरी, फणसे, पोंभुर्ले, सौंदाळे, वाघोटण या ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदाची निवडणुक बिनविरोध झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.