
साताऱ्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिनीला प्राध्यापकाने अश्लील मेसेज पाठवत संबंध ठेवण्याची मागणी केली. कराड तालुक्यातील उंब्रज येथील ही घटना असून या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी प्राध्यापकाला अटक केली आहे.
बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला प्राध्यापकाने सोशल मीडियावर अश्लील मेसेज पाठवले. याशिवाय विद्यार्थिनीवर संबंध प्रस्थापित केल्याचाही आरोप आहे. पीडितेने घडला प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत प्राध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.




























































