‘भाखरवडी’च्या सेटवर ‘सत्यनारायण’

सोनी सब वाहिनीवरील भाखरवडी ही मालिका देशभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. गोखले आणि ठक्कर कुटुंबावर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करीत आहे. मालिकेचे यश साजरे करण्यासाठी नुकतेच सेटवर सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन करण्यात आले. जेडी मजेठिया व आतिष कपाडिया यांनी मालिकेची निर्मिती केली आहे. देवेश भोजानी आणि परेश गनात्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विनोदी पद्धतीने महत्त्वपूर्ण कौटुंबिक मूल्यांना सादर करणारी ही मालिका हलकीफुलकी व भावनाप्रधान आहे. पात्रांमधील जिवंतपणा प्रेक्षकांना आवडत आहे, जिथे जातो तिथे प्रेक्षकांचे मिळणारे प्रेम बघून आनंद होतो, अशा भावना देवेश भोजानी आणि परेश गनात्रा यांनी व्यक्त केल्या. ही मालिका सोनी सब वाहिनीवर दररोज रात्री 8 वाजता बघता येईल.