सत्येंद्र जैन तिहार जेलच्या बाथरूममध्ये कोसळले

दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हे गुरुवारी चक्कर आल्याने तिहार जेलच्या बाथरूममध्ये कोसळले. त्यानंतर त्यांना डीडीयू रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तिथे त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले. आता त्यांना दिल्लीतल्या एलएनजेपी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. जैन यांना एकाच आठवडय़ात दुसऱयांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारीदेखील बाथरूममध्ये पडल्याने जैन यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती. त्यावेळी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते.