सिग्नलवर थांबलाय मग इंजिन बंद करा! इंधन बचतीबाबत लातुरात अनोखी जनजागृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

सिग्नलवर थांबल्यानंतर अनेकजण आपली वाहने चालूच ठेवतात. यामुळे इंधन आणि पर्यावरण याची मोठी हानी होत असून, याबाबत लातुरात तरुणांनी अभियान राबवून जनजागृती केली आहे. सिग्नलवर थांबताय, मग आपली वाहने बंद करा, असे डिजिटल फलक लातुरात झळकले आहेत.

वसुंधरा प्रतिष्ठानने समाजवादी पार्टीच्या सौजन्याने हा जनजागृती उपक्रम लातुरात राबविला आहे. या फलकाचे अनावरण रविवारी हनुमान चौकात करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अली मोहम्मद शेख यांची उपस्थिती होती. यावेळी नूर मोहम्मद शेख, शाहिद शेख, वसुंधरा प्रतिष्ठानचे लातूर शहराध्यक्ष उमाकांत मुंडलिक, सोशल मीडिया प्रमुख रामेश्वर बावळे, सदस्य हुसेन शेख, अनिकेत मुंदडा, प्रशांत स्वामी, आसिफ सय्यद, अन्वर सय्यद आदींची उपस्थिती होती. अनेकजण सिग्नलवर थांबल्यानंतर आपले वाहन चालूच ठेवतात. त्यामुळे जर सिग्नलवर प्रत्येकाने आपली वाहने बंद केली तर मोठ्या प्रमाणात इंधन बचत होऊन पर्यावरण रक्षण होणार आहे, असे मजकूर या फलकावर लिहण्यात आले आहे.