समित्या नको, वन्य जीवन वाचवण्यासाठी कृती करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील नष्ट होणारे वन्य जीवन आणि वन्य प्राण्यांना वाचवण्यासाठी शास्त्रिय आणि प्रभावी उपाययोजना राबवा. त्यासाठी केवळ कागदावर समित्या नेमून कसे चालेल असा संतप्त सवाल करीत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले. केंद्रीय पर्यावरण, वने आणि पर्यावरणबदल मंत्रालयाने वन्य जिवांच्या रक्षणासाठी जानेवारी 2017 मध्ये लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करा आणि वन्य जीवन वाचवा, असेही न्यायालयाने याप्रसंगी राज्य प्रशासनाला बजावले.