एसबीआय खातेधारक आहात….आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी वापरा ‘ही’ सुविधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sbi-poster

देशातील सर्वाजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयने आपल्या खातेधारकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. ज्या खातेधारकांनी आधार कार्ड पॅन कार्डला जोडलेले नाही. त्यांनी तत्काळ आधार आणि पॅनकार्ड लिंक करावे, असे आवाहन बँकेने खातेधारकांना केले आहे. आधार आणि पॅम कार्ड लिंक करण्यासाठी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नाही, तर पॅन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. त्यानंतर अशा खातेधारकांना बँकेशी संबधित व्यवहार करता येणार नाही.

एसबीआयने आपल्या ट्विटर अंकाउंवरून याबाबतची माहिती दिली आहे. खातेधारकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत आणि त्यांना सुरळीत व्यवहार करता यावेत, यासाठी त्यांनी आधार आणि पॅन कार्ड लिंक करावे, असे आवाहन बँकेने केले आहे. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर पॅन कार्ड रद्द करण्यात येईल. तसेच खातेधारकांना कोणतेही व्यवहार करता येणार नाही, असेही बँकेने स्पष्ट केले आहे.

आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी एसबीआयच्या पोर्टल सुविधेचाही वापर करता येणार आहे. त्यासाठी https://www।incometax।gov।in/iec/foportal/ या साईटवर भेट द्या. काही स्टेप फॉलो केल्यावर तुमचे आधार पॅन कार्डशी लिंक होणार आहे.

एसबीआय पोर्टलद्वारे असे करा आधार पॅन कार्ड लिंक

  • आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी एसबीआयच्या आयटी पोर्टलवर जा. त्याची लिंक https://www।incometax।gov।in/iec/foportal/ अशी आहे.
  • त्यावर होमपेजवर स्कोल करत Link Aadhaar या पर्यायावर क्लिक करा.

किंवा

  • https://eportal।incometax।gov।in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar या लिंक द्वारेही थेट आधार आणि पॅन कार्ज लिंक करता येणार आहे.
  • लिंक आधार या पर्यायावर क्लिक केल्यावर पॅनकार्ड, आधारकार्ड, आधारकार्डावरील नाव आणि 10 आकडीमोबाईल क्रमांकासह काही माहिती त्यात भरावी लागेल.
  • ‘I Have Only Year Of Birth In Aadhaar Card’ और ‘I Agree To Validate My Aadhaar Details’ हे अचूक असल्याची पडताळणी करावी लागेल.
  • त्यानंतर लिंक आधारवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक होणार आहे.