
एसबीआय बँक चार दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. बँकेचे कर्मचारी 25 ते 26 मे असे दोन दिवस संपावर जाणार असून 23 मे रोजी चौथा शनिवार आणि 24 मे रोजी रविवार असल्याने 23 ते 26 असे चार दिवस बँका बंद असणार आहेत. ‘ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशन’ने संप पुकारला आहे.





























































