रामजन्मभूमी वादावर आजपासून सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme_court_295

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज शुक्रवारी सुनावणी सुरू होत आहे. या प्रकरणातील विविध याचिकांवरील सुनावणी सरन्यायाधीश रंजन गोगाई आणि न्यायमूर्ती एस. के. कौल यांच्या खंडपीठासमोर प्रलंबित आहे. मात्र पुढील सुनावणीसाठी तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाची स्थापना होण्याची शक्यता आहे.