
बाहुबली या चित्रपटाचे दोन्ही भाग जबरदस्त हिट झाले. या चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. या चित्रपटात एक छोटीशी भूमिका करणारी अभिनेत्री देखील सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. स्कार्लेट मेलिश विल्सन असे त्या अभिनेत्रीचे नाव असून तिने बाहुबलीतल्या एका गाण्यात बेली डान्स केला होता.
स्कार्लेट विल्सन हिने इंस्टाग्रामवर एक टॉपलेस फोटो शेअर केला असून तिचा हा बोल्ड फोटो चांगलाच चर्चेत आला आहे. स्कार्लेट एक ब्रिटीश मॉ़डेल असून सध्या ती बॉलिवूडमध्ये तिचे नशीब आजमावत आहेत. बाहुबली चित्रपटातल्या मनोहरी गाण्यात ती बेली डान्स करताना दिसली होती. तसेच इम्रान हाशमी सोबत तिने द बॉडी या चित्रपटातही एक गाणं चित्रीत केलं होतं. तिने अनेक तेलुगू चित्रपटात आयटम नंबरही केले आहेत.
स्कार्लेट ही अत्यंत बोल्ड असून ती कायम इंस्टाग्रावर तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. स्कार्लेट बॉलिवूडमध्ये जरी नवीन असली तरी इंस्टाग्रावर तिचे तब्बल 2 लाख 94 हजार फॉलोअर्स आहेत.


























































