स्कूल बसेसना बेस्ट आगारात पार्किंग सवलत

385
प्रातिनिधीक फोटो

बेस्टने आपल्या आगारांमध्ये वाहनांना पार्क करण्याची जागा देऊन अशा वाहनांकडून भाडे वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात आता शाळांच्या बसेसना सवलत देण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीने आज मंजूर केला. त्यामुळे शाळांच्या बसेसना महिन्याला आता 3,700 ऐवजी दोन हजार रुपये आकारले जाणार आहेत.

शहरामध्ये वाहने रस्त्यावर कुठेही पार्क केली जात असल्याने होणारी वाहतूककोंडी टाळण्याकरिता बेस्टने वाहनतळांकरिता आपल्या आगारातील जागा भाडय़ाने देण्याचा निर्णय घेतला होता. बेस्ट प्रशासनाने आपल्या 27 डेपोंमध्ये 1 ऑगस्टपासून खासगी गाडय़ांना पार्किंगची सोय उपलब्ध करून दिली. त्यामुळे पार्ंकगची समस्या दूर होण्याबरोबरच बेस्टला महसूलही मिळणार होता. त्यामध्ये खासगी चारचाकीपासून पर्यटन वाहने आणि शाळेच्या बसेसचा देखील समावेश आहे. खासगी चारचाकी वाहन पार्क करण्यासाठी महिन्याला 3,080 तर खासगी बसकरिता 3,700रुपये बेस्ट प्रशासन घेते. परंतु पार्किगचे दर हे शालेय बसेसकरिता जास्त असल्यामुळे वाहनचालकांनी बेस्ट प्रशासनाकडे ते कमी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार बेस्ट प्रशासनाने 3,700 रुपयांऐवजी 2 हजार रुपये आकारण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीने शुक्रवारी मंजूर केला.

पार्किगमधून बेस्टला मिळालेला महसूल
वाहनाचा प्रकार      वाहनांची संख्या
खासगी बसगाडय़ा      338
शालेय बसगाडय़ा         32
इतर वाहने              190
एकूण वाहने            560
महसूल              11,34,065 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या