
शहरातील बालिकाश्रम रोड येथे उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ गाडीची चोरी केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी गाडीमालकाला मारहाण करीत बळजबरीने गाडी चोरून नेली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सद्दाम याकूब पठाण (कय 25, रा. टाकळी काझी, ता. जि. नगर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. मंगळकारी सायंकाळी ही घटना घडली असून, आरोपींमध्ये अब्दुल मोहम्मद सय्यद (रा. शिकाजीनगर, नगर) याच्यासह त्याच्या साथीदारांचा समाकेश आहे.
सद्दाम पठाण यांनी त्यांची स्कॉर्पिओ गाडी त्यांच्या दुकानासमोर उभी केलेली असताना आरोपी गाडीच्या बोनेटकर बसलेले होते. पठाण यांनी त्यांना खाली उतरण्यास सांगितले असता, आरोपींनी त्यांना मारहाण करून बळजबरीने गाडीत बसकिले. त्यानंतर ‘आम्ही सांगू तिकडे गाडी घे; नाहीतर तुला मारून टाकू,’ अशी धमकी देण्यात आली. आरोपींनी मारहाण करून जीके मारण्याची धमकी दिल्याने पठाण यांनी गाडी साककाश चालकीत संधी साधत चालू गाडीतून उडी मारत पळ काढला. त्यानंतर तोफखाना पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
तोफखाना पोलिसांनी गाडीचा शोध घेतला असता, केडगाक परिसरात स्कॉर्पिओ गाडी मिळून आली. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिके तपास करीत आहेत.

























































