
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरविणारे भारतीय दंडसहितेतील कलम 377 अवैध असून, समलैंगिकता गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. संविधानात समानतेचे सूत्र आहे. समलिंगींना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. समलैंगिक व्यक्तींबाबतचा दृष्टीकोन लोकांनी बदलावा, जुनी विचारधारा सोडून द्यावी, असेही न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे. दरम्यान, या निकालानंतर समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी लढा देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींनी आनंदोत्सव साजरा केला.
न्यायालयाने काय म्हटले
- आपली ओळख आहे तशी टिकविणे हा एखाद्याच्या आयुष्यातील महत्वाची गरज असते.
- आपल्या व्यक्तिमत्त्वापासून कोणीही पळू शकत नाही.
- समलैंगिकता हा गुन्हा ठरत नाही.

























































