
मशीदीवरील भोंगे 4 मे पर्यंत उतरवा, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. या भोंग्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी आणि राज्यात शांततेचे वातावरण राहावे, यासाठी सरकार आणि पोलीस प्रशासन योग्य ती काळजी घेत आहेत.
Loudspeaker row | Security heightened outside Maharashtra Navnirman Sena chief Raj Thackeray’s residence in Mumbai pic.twitter.com/fZBxgMIRoy
— ANI (@ANI) May 3, 2022
राज्यातील सुरक्षेचा विचार करता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थाबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या निवासस्थानाजवळील बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने मनसे कार्यकर्त्यांनीही त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली आहे. त्यामुळे पोलीस सतर्क असून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात येत आहे.


























































