वालावल येथे बचत गट मेळाव्याला प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

श्रीम. मनोरमा चौधरी चारिटेबल ट्रस्ट व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ तालुक्यातील वालावल येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या महिला बचत गट मार्गदर्शन मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

जि.प. उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती राजन जाधव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष दयानंद चौधरी तसेच पं.स.सदस्या सौ. प्राजक्ता प्रभू, ढोलम, सरपंच निलेश साळसकर, उपसरपंच संजू मटकर आदींसह गावातील बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी बचतगटाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव संदीप साळसकर यांनी केले.