
सामना प्रतिनिधी, सेलू
शहरात सध्या नगर परिषदेच्या वतीने विविध विकास कामे केली जात आहेत त्यापैकी बहुतांश कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत असून होत असलेली कामे निवीदे नुसार होत नसल्यामुळे त्यात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे होत असलेल्या कामाची प्रत निकृष्ट प्रतीची असून सिमेंटच्या कमी वापर करणे रस्त्याची जाडी कमी करणे रस्त्यामध्ये स्टील न वापरणे सिमेंट व गिट्टीच्या आयोजि मातीचा जास्त वापर करणे ह्या गोष्टीमुळे त्यामुळे संबंधित कामाचा दर्जा राखला जात नाही या सर्वच कामाची चौकशी गुणनियंत्रण विभागाकडून करण्यात यावी अशी मागणी दिलीप डासाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत डासाळकर यांनी म्हटले आहे की, सेलू शहरात सध्या वैशिष्ट्यपूर्ण, नगरोत्थान, दलितेतर, युडी ६, आदी विविध निधीतून जवळपास साडे साडेसात ते आठ कोटी रुपयांची कामे मोठ्या प्रगतीपथावर असून या सर्वच कामांमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. कुठलीच कामे निविदेनुसार केली जात नाहीत. शिवाय सदरील कामात योग्य प्रमाणात सिमेंटचा वापर होत नाही. तसेच यामध्ये वापरण्यात येणाऱ्या स्टील, दगडाचा वापरही अगदी कमी प्रमाणात केला जात आहे. काळ्या मातीचा भरमसाठ वापर होत आहे. परिणामी सदरील कामे निकृष्ट दर्जाची होत आहे. या सर्व कामांची चौकशी गुणनियंत्रण विभागाकडून होणे अत्यंत गरजेचे आहे.
दरम्यान, सदरील कामे करणारा कंत्राटदार अध्यक्षाच्या मर्जीतील असून काही कंत्राटदाराच्या नावा अडून नगरसेवकच कामे करत असल्याची चर्चा रंगत आहे. सदर कामामध्ये सिमेंट रस्ते, नाले याशिवाय शादी खाणे इत्यादींची विकासकामे होत आहेत. या सर्वच कामांचा दर्जा राखला जावा ही किमान अपेक्षा नागरिकांची असून कामे व्यवस्थित केल्यास केलेल्या कामाचे आयुष्य वाढेल मात्र मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष हे सर्वच नगरसेवकांना कसे सांभाळता येईल, याकडे जास्त लक्ष देत आहेत. वरील सर्वच बाबींची तात्काळ चौकशी करून सदर कामाची देयके थांबवावीत व शासकीय निधीचा गैरवापर थांबवून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी दिलीप डासाळकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.































































