
सामना ऑनलाईन । मुंबई
रेल्वे स्टेशनवर प्रसाधनगृहांची अवस्था अनेकदा खराब असते. प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. अशावेळी तक्रार कुणाकडे करायची असा प्रश्न असेल तर आता मध्य रेल्वेने व्हॉट्सअॅपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ९९८७६४५३०७ (9987645307) या क्रमांकावर मध्य रेल्वेने व्हॉट्सअॅप तक्रार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सेवा २४ तास सुरू असेल. यावर प्रसाधनगृहासंदर्भातील तक्रारी किंवा प्रसाधनगृहातील स्वच्छता याचा फीड बॅक देखील देता येईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.



























































