
सामना ऑनलाईन । सिडनी
टेनिसपटू सेरेना विलियम्स ही ब्रेस्ट कॅन्सरच्या जनजागृतीसाठी टॉपलेस झाली आहे. सेरेनाने तिच्या आवाजात एक गाणे रेकॉर्ड केले असून या गाण्याच्या व्हिडीओमध्ये सेरेना टॉपलेस झाली आहे. ‘आय टच मायसेल्फ’ असे त्या गाण्याचे बोल आहेत.
सेरेनाने तिच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला असून त्यात ती ऑस्ट्रेलियन बँड ‘द डिविनिल्स’ने ब्रेस्ट कॅन्सरच्या जनजागृतीसाठी तयार केलेले गाणे गाताना दिसत आहे. आता पर्यंत जवळपास पंधरा लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिलेला आहे. सेरेनाच्या या जनजागृतीचे नेटकऱ्यांनी कौतुक देखील केले आहे.
SUMMARY : SERENA WILLIAMS GOES TOPLEESS FOR BREAST CANCER AWARENESS



























































